नमस्कार मित्रांनो हरवलेले पान , या पॉडकास्ट या सदरात तुमचं स्वागत आहे
मी तुमचा आभारी आहे.
तुम्ही माझे हरवलेले पान हे पॉडकास्ट ऐकलेत तुम्हाला आवडले तुमच्या प्रतिक्रियाही मिळाला त्यामुळे नुकतेच माझ्या हातात आलेले विल्यम शेक्सपिअर च्या काळातील एक हरवलेले पान तुमच्या समोर सादर करीत आहे. विल्यम शेक्सपियर नाटक का ज्याने 37 नाटक केली होती. आज इंग्रजी साहित्याची ओळखच त्याच्यापासून होते विल्यम शेक्सपियर चे रोमिओ-ज्युलिएट हे नाटक तर सर्व ज्ञात आहे जवळजवळ सर्व देशांमध्ये त्यावर चित्रपटही बनलेआहेत.
विलियम शेक्सपियर चे आजचे माझे हे हरवलेले पान एका लेखकाच्या कलाकृती मागील गोष्ट सांगते. रोमिओ-ज्युलिएट विलियम शेक्सपियर चे प्रसिद्ध झालेले नाटक आपल्याला ही पात्रे तर ओळखीचे आहेतच, पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का नाही ही पात्रे खरी होती का नाही? का ही फक्त विल्यम शेक्सपियर नावाच्या एका लेखकाची एक कल्पनाच होती चला तर मग 14 व्या शतकात लुगी डा पोर्टो हा इटालियन लेखक होता
त्याने त्याकाळी चौदाव्या शतकात रोमिओ-ज्युलिएट एक दंतकथा ऐकली त्यावर त्याने पुढे एक लघुकथा लिहली. त्यानंतर सोळाव्या शतकात एका फ्रेंच लेखकाने रोमिओ-ज्युलिएट लघुकथेवर एक मोठे काव्य लिहिले, विल्यम शेक्सपिअर च्या जेव्हा हे सोळाव्या शतकात लक्षात आले तेव्हा त्याला त्या दंतकथे मधील पात्रे, त्या दंत कथेचे स्वरूप अशी पार्श्वभूमी बघून लक्षात आले की यावर एक आपण नाटक रचले तर? विल्यम शेक्सपियर ने मुख्य पात्रांची नावे हीच ठेवा व उर्वरित पात्रांची नावे बदलली पण मुख्य कथेचे स्वरूप त्याच्यातील घटना या तशाच ठेवल्या जश्या पूर्वीपासून प्रसिद्ध असलेल्या कथेमध्ये होत्या. त्यात काही गावे व जागांचा उल्लेख ही होता. विल्यम शेक्सपिअर ने तो तसाच्या तसा ठेवल्या. आजही या जागा पर्यटकांचा पर्यटकांना आकर्षित करतात.
मलाही गंमत वाटते की एका लेखकाची कल्पना शतकानुशतके आपल्याला कशी मंत्रमुग्ध करते आणि जगात कितीतरी असे कितीतरी लेखक-कवी फिल्म डायरेक्टर त्यातून प्रेरणा घेतात.
रोमिओ ज्युलिएट हे नाटक विल्यम शेक्सपियर ने नक्कीच एका इटालियन दंतकथे वरून प्रेरीत होऊन रचलेले नाट्य आहे. आपण याला प्रेरणा म्हणू शकतो. साहित्याच्या एका प्रकारात ती दंतकथा होती नंतर कथा झाली नंतर काव्य झाले आणि त्यातून नाटकाची रचना झाली बरेचशे बदल हि झाले पण त्याची जादू अजूनही कायम आहे.
विल्यम शेक्सपियर हा तसा भारतीयांच्या पण ओळखीचा, त्याची बरीच नाटकं भारतीय सिनेमांमध्ये रूपांतरित करून घेतली गेली आहेत.
विल्यम शेक्सपियर चे एक नाटक ऑथेल्लो आणि त्यातील प्रसिद्ध पात्र डेस्डेमोना, जिओवांनी बॅटीस्टा गिराल्डी इटलीमध्ये त्याकाळी लेखक होता जिराल्डी त्यांनी एक लघुकथा लिहिली होती त्याचं नाव त्यामधील पात्र जे होतं डेस्डेमोना, हि कथा लघुकथा त्याकाळी युरोपमध्ये खूप प्रसिद्ध होते
विल्यम शेक्सपियर ला त्यावरून प्रेरणा मिळाली त्यांनी एक संपूर्ण नाटक रचले ऑथेल्लो नाटक रचताना त्यातील कलाकार, त्यांचा बाज राजकीय सामाजिक स्थळ,-काळ याचे समीकरण, संवाद, स्वागत यांचे अजब मिश्रण करून एक आयाम कथेला त्यांनी बहुआयामी बनवले. विल्यम शेक्सपियर ची पात्रे त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला आजही आपल्या अवतीभवती सहज सापडतात.
इटालियन लेखक-कवी गिराल्डी उर्फ सिंधिया चा डेस्डेमोना आणि कॅप्टन मूर चे पात्र विल्यम शेक्सपियरला प्रेरित करते परंतु त्यात त्याने काही मूलभूत बदल केले. विलियम शेक्सपियर ने इन्सिगन लॅगो हे पात्र डेस्डेमोना कडे आकर्षित होत नाही त्यामुळे लेगो पात्राचा स्वभाव अस्पष्ट आणि गूढ राहतो. तुम्हाला आठवत असेल तर ऑथेल्लो वरून भारतामध्ये विशाल भारद्वाज यांचा ओमकार या नावाचा चित्रपट आला त्यातील लेगो म्हणजे लंगडा त्यागी चे पात्र आणि डेस्डेमोना म्हणजे करीना कपूर ने रंगवलेले पात्र. . .
विल्यम शेक्सपिअर ने दंतकथा लोककथे मधील प्रसिद्ध पात्र त्याच्या नाटकात दिसतात पण त्याच बरोबर त्याचे राजकीय सामाजिक संबंध ही तेवढेच प्रबळपणे तू दाखवले. सिपरस हे त्याकाळी काळातील सागरी बेट व्यापारासाठी प्रसिद्ध होते १४७० ते १५७१ टर्की ने ते बेट काबीज केले पुढे लेपॅन्टो लढाई ख्रिश्चन फौजेने ते पुन्हा मिळवून इंग्लंडच्या एक योध्या चा त्यात गौरव झाला पुढे विल्यम शेक्सपियर ने त्याचे पात्र ऑथेल्लो जेम्स म्हणून पुढे आणले हे भांडण फक्त व्हेनिस आणि ऑटोमन एम्पायर चे दाखवले.
ऑथेल्लो पहिली भेट वस्तू जी डेस्डेमोना ला दिली होती ती होती एक रुमाल, एका ईजिप्शियन मांत्रिका कडून मिळालेला असतो. त्याकाळी पूर्वेकडील देश व त्यांची संस्कृती याविषयी बरयाच गोष्टी पाश्चिमात्य प्रवासवर्णनात लिहिल्यामुळे प्रचलित झाल्या होत्या त्यातलीच ही रुमालाची गोष्ट
त्या रुमालावर लिहिलेला एक अक्षर त्यातून निर्माण झालेला पेच प्रसंग, गुड रहस्य हे कितीतरी चित्रपटात अगदी कालपर्यंत बॉलिवुडमध्ये आपल्याला सहज दिसते. गिराल्डी च्या गोष्टीत पण आपल्याला हा रुमाल सापडले
आज इतक्या वर्षांनी देखील आज इतक्या वर्षांनंतर देखील विल्यम शेक्सपियर चे नाटक व त्यांचा सध्याच्या समाज मानवी नातेसंबंधांची असलेला रूपकात्मक संबंध हा कायम आहे लुईगी दा फोटो या इटालियन लेखकाने लिहिलेले रोमिओ-ज्युलिएट ही लघुकथा असू देत किंवा जिओव्हानी बटिस्टा जिराल्डी या लेखकाचे ऑथेल्लो साठी विल्यम शेक्सपिअर ला मिळालेली प्रेरणा असूदेत. हे सर्व काही एका लेखकांनी दुसऱ्या लेखकाला त्याच्या एका लेखकांनी दुसऱ्या लेखकाला हा दिलेला वारसा म्हणावा की सृजनशीलता वाढवण्यासाठी दिलेली प्रेरणा काही म्हणा या लेखकांच्या कल्पना विश्वातून आकारलेली पात्रे त्यांचा कथाविस्तार आजही आपल्याला भुरळ पाडतो. चला तर मग शोधूयात आणखी एक हरवलेले पान !
